दिवसा घर फोडून रक्कम पळवली

दिवसा घर फोडून रक्कम पळवली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वकीलांचे घर दिवसा फोडून चांदीचे पैजन व रोख रक्कम असा 15 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. सोमवारी सकाळी 11.15 ते दुपारी 2.45 वाजेच्या दरम्यान कल्याण रोडवरील गणेशनगर परिसरातील रायगड अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली.

दिवसा घर फोडून रक्कम पळवली
चास कामरगाव घाटात लष्कराची गाडी पलटली

या प्रकरणी अ‍ॅड. राहुल राजेंद्र गायकवाड (वय 38) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरट्यांनी फिर्यादी यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला.

दिवसा घर फोडून रक्कम पळवली
मतिमंद मुलीवर अत्याचार, आरोपी गजाआड

घरातील सामानाची उचकापाचक करून 14 हजार रूपये रोख रक्कम व चांदीचे पैजन चोरून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस नाईक चव्हाण करीत आहेत.

दिवसा घर फोडून रक्कम पळवली
मानोरीत बहीण-भावाला कुर्‍हाडीच्या तुंब्याने मारहाण

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com