घरफोडी करणार्‍या टोळीचा मोरक्या जेरबंद

सहा तोळे सोने, 920 ग्रॅम चांदी हस्तगत
घरफोडी करणार्‍या टोळीचा मोरक्या जेरबंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दिवसा घरफोडी (Burglary) करणार्‍या टोळीच्या मुख्य आरोपीला अटक (Arrested) करण्यात आली आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या (Kotwali Police Station) गुन्हे प्रकटीकरण शाखेने ही कामगिरी केली. आरोपीकडून (Accused) सहा तोळे सोने (Gold) आणि 920 ग्रॅम वजनाची चांदी ( Silver) असा दोन लाख 42 हजार 600 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अविनाश दिलीप क्षेत्रे (रा. भुषणनगर, केडगाव, अहमदनगर) असे अटक (Arrested) केलेल्या आरोपीचे नाव आहे.

20 मे रोजी पहाटे पुजा मनोज बडे (रा. भूषणनगर, केडगाव) या कुटुंबासह देव दर्शनासाठी गेल्या असता त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख तीन हजार 100 रूपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून (Stealing Gold and Silver Jewelry) नेले होते. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींचा शोध सुरू असताना हा गुन्हा करणारे आरोपी पुणे येथील असून त्यांना माहिती देणारे आरोपी नगर शहरातील असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक पुणे येथे तर दुसरे पथक पोलीस स्टेशनच्या हद्दीत आरोपींचा शोध घेत होते. या दरम्यान, आरोपी क्षेत्रे शहरातील गंजबाजार परिसरात चोरलेला सोने-चांदीचा मुद्देमाल विकण्यासाठी घेऊन आला असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील इतर आरोपींचा कोतवाली पोलिसांचे पथक शोध घेत आहे. तर सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

निरीक्षक शिंदे, सहायक निरीक्षक पिंगळे, गुन्हे शोध पथकाचे अंमलदार गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, योगेश कवाष्टे, अभय कदम, दीपक रोहोकले, सुजय हिवाळे, तानाजी पवार, अमोल गाढे, सोमनाथ राऊत, अतुल काजळे, मोहन भेटे, नकुल टिपरे, प्रशांत राठोड, राहुल गुंडु, वसुधा भगत, छाया गायकवाड यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com