बैलगाडा शर्यतीच्या वादातून मोठा राडा! समृद्धी महामार्गावर दगडफेक करत जीवे मारण्याचा प्रयत्न

बैलगाडा शर्यतीच्या वादातून मोठा राडा! समृद्धी महामार्गावर दगडफेक करत जीवे मारण्याचा प्रयत्न

वैजापूर | प्रतिनिधी

बैलगाडी शर्यतीत झालेल्या जय पराजय वादातून एका गटाने समृद्धी महामार्गावर दगडफेक करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वैजापूर पोलिसांत

पंकज सिंग, हंसराज सिंग राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश राजपूत, गणेश राजपूत, डांगे पाटील घोडेवाले, धनु डांगे पाटील (राहणार शिवराय) व इतर 15 ते 20 जण असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तींची नावे आहे.

बैलगाडा शर्यतीच्या वादातून मोठा राडा! समृद्धी महामार्गावर दगडफेक करत जीवे मारण्याचा प्रयत्न
माणुसकी ओशाळली! अल्पवयीन मुलीवर अत्याचार, मदतीसाठी अर्धनग्न आणि रक्तबंबाळ अवस्थेत दारोदार फिरली पण...

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार पंकज राजपूत यांचा अरापुर शिवारात बैलगाडा शर्यत हार जितच्या कारणावरून वाद झाला होता. यानंतर तेथून वैजापूरकडे समृद्धी महामार्गाने परतत असताना शिवराई शिवारामध्ये वाद झालेल्या मंडळीने पंकज राजपूत यांची पिकप (एम एच २० इ एल 2630) व शकीर नूर सय्यद यांची पिकप गाडी (एम एच 19 बी एम 2742) या अडवून तुफान दगडफेक केली.

यामध्ये अमोल कराळे, अजय राजपूत, वाल्मीक जाधव यांना देखील जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. तर आर्यन त्रिभुवन, राजू उर्फ वसीम मेहता सय्यद यांना किरकोळ दुखापत झाल्या. मात्र या सर्व वादामध्ये आयान इजाज सय्यद याच्या डोक्यामध्ये दगड लागल्याने त्याला जबर दुखापत झाली आहे. त्याच्यावर छत्रपती संभाजी नगर येथील खाजगी रुग्णालयात मेंदूवर शस्त्रक्रिया झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

हार जीतच्या कारणावरून झालेल्या वादाच्या ठिणगीचा भडका दगफेकित झाला अन् वीस जणांच्या एका गटाने पंकज राजपूत व शकील नुर सय्यद यांच्या गाड्या अडवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पंकज राजपूत यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जीवे मारण्याचा प्रयत्न सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राम घाडगे हे करीत आहेत

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com