बैलगाडीच्या चाकाखाली सापडून बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

बैलगाडीच्या चाकाखाली सापडून बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

बैलगाडीच्या (Bullock cart) चाकाखाली सापडून एका बारा वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू (Unfortunate Death of a Child) झाला आहे. पाथर्डी (Pathardi) तालुक्यातील मोहरी (Mohari) येथे हि घटना घडली असून मृत्यू (Death) झालेल्या मुलाचे योगेश सोमनाथ नरोटे असे नाव आहे. बुधवार दि. १० रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमार हा दुर्देवी अपघात (Accident) झाला. योगेश त्यांच्या स्वतःच्या मालकीची बैल गाडीतून (Bullock cart) शेतामधून गुरासाठी चारा घेऊन घराकडे जात होता. मेळवस्ती ह्या त्यांच्या राहत्या घराजवळच योगेश हा बैलगाडीतून (Bullock cart) खाली पडला.

त्यावेळी डोक्यावरून बैलगाडीचे (Bullock cart) चाक गेल्याने मोठा रक्तश्राव होऊन त्यात मृत्यू झाला. घटनेनंतर तात्काळ उपचारासाठी पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात (Sub-District Hospital) आणण्यात आले. मात्र योगेशचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. योगेशचे वडिल शेतकरी आणि गरीब कुटुंबातील आहे. त्या कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळल्याने तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. योगेश हा त्याच्या आई वडिला एकुलता एक मुलगा असुन एक मोठी बहिण आहे. योगेश हा आदर्श विद्यालयात इयत्ता ७ वीत शिकत होता. घरातील आई-वडिलांबरोबर शेतीचे व घरातील छोटे मोठे काम योगेश करत होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com