बुंगाटांना वेसण !

बुंगाटांना वेसण !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बुलेटचा मोठा (Bullet Sound) आवाज येण्यासाठी सायलन्सरमध्ये बदल करणार्‍या बुलेटसह (Bullet) इतर वाहनांवर शहर वाहतूक नियंत्रण शाखेने कारवाई (City Traffic Control Branch Action) केली आहे. 24 दिवसांमध्ये एकूण 30 बुलेटवर कारवाई (Bullet) करण्यात आली. तर फॅन्सी नंबर (Fancy Number) , विनानंबरच्या 216 दुचाकींवर कारवाई (Action on Bikes) करत 83 हजार रुपये दंड वसूल (Fine Recovered) करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले (Police Inspector Rajendra Bhosale) यांच्या नेतृत्वाखाली शहरातील प्रमुख चौकांमध्ये दररोज सायंकाळी चार ते सहा वाजण्याच्या दरम्यान नाका बंदी करून ही कारवाई करण्यात येत आहे. बुलेट या दुचाकीचा मोठा आवाज येण्यासाठी सायलन्सरमध्ये बदल केला जात आहे. कंपनीने दिलेला सायलन्सर काढून मोठा सायलन्सर टाकला जातो. त्यामुळे मोठा आवाज येतो.

अशा स्वरूपाच्या बुलेटवर कारवाई करण्यात आली आहे. बुलेटसह वाहतूक नियमानुसार नंबर नसलेल्या, विना नंबरच्या दुचाकींवर कारवाई करण्यात येत आहे. तसेच करोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात येत आहे.

फॅन्सी नंबर, विना नंबरसह वाहतुकीचे नियम मोडणार्‍या सर्व वाहनांवर कारवाई सुरू आहे. बुलेटचा मोठा आवाज येण्यासाठी सायलन्सरमध्ये बदल करणार्‍या बुलेट दुचाकीवर कारवाई करण्यात येत आहे.

- राजेंद्र भोसले, पोलीस निरीक्षक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com