बेफाम म्हशीचा धिंगाणा

रस्त्यात दिसेल त्याला जखमी केले
बेफाम म्हशीचा धिंगाणा

जेऊर कुंभारी |वार्ताहर| Jeur Kumbhari

हिंगणी येथे गोठ्यात दोन म्हशींचे भांडण झाले यात जखमी झालेल्या एका म्हशीने साखळी तोडुन पळ काढला. रस्त्यात दिसेल त्याला जखमी करत होती.

हिंगणी येथील दामु शिवराम चंदनशिव यांच्या गोठ्यात दोन म्हशींचे मारामारी झाली. यात एकीचे शिंग तुटले तर दुसरीने रागाने बेफाम होऊन साखळी तोडुन पळ काढला. ती थेट कुंभारी शिवारात बढे वस्ती येथील स्वाती किरण बढे या महीलेला धडक दिली .यात त्यांना मुका मार लागला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. रात्रभर सैरभैर फिरल्यानंतर सकाळी 7 वाजेच्या सुमारास कुंभारी शिवारात माजी उपसरपंच विजय कदम यांच्या पेरुच्या बागेत ठाण मांडले.

सकाळी आठ वाजेपासून परिसरातील नागरिक तसेच म्हशींचे मालकांनी पकडण्याचा प्रयत्न केला परंतु बेफाम झाल्याने तिने पकडण्यास गेलेल्या किशोर विजय कदम व इतरांना जखमी केले व बागेची नासधूस केली. यात मालक चंदनशिव यांना गंभीर दुखापत झाली. माजी सरपंच विजय कदम, सरपंच दिगंबर बढे, कुंभारी नं. 1 चे व्हा. चेअरमन सतिश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पाटील पंडित पवार यांनी काही तरुणांना घेउन जिव धोक्यात घालत ट्रॅक्टरच्या साह्याने सुमारे 6 तासाच्या अथक परिश्रमानंतर त्या बेफाम म्हशीला पकडले.

पशुधन विकास अधिकारी डॉ. जामदार, डॉ. बापूसाहेब पंडोरे यांनी त्या म्हशीला शांत करण्याचे इंजेक्शन दिले आणि वातावरण शांत झाले. अनेक रागाने चाल करून आल्याने बघ्यांची धावपळ उडत होती. याकामी तुषार कदम, दिनेश साळुंखे, मच्छिंद्र कदम, कैलास कबाडी, यशवंत कदम, गोकुळ माळी, सुनिल ठाणगे व परिसरातील तरुणांचे सहकार्य लाभले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com