बसपाचे 13 जुलैला राज्यव्यापी आंदोलन

मागासवर्गीयांचे आरक्षण कायम ठेवण्याची मागणी
बसपाचे 13 जुलैला राज्यव्यापी आंदोलन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अनुसूचित जाती-जमातीच्या (Scheduled Castes and Scheduled Tribes) कर्मचार्‍यांना पदोन्नतीत आरक्षण (Reservation) देण्यात यावे, ओबीसींच्या राजकीय आरक्षण (OBC Political Reservation) कायम रहावे व महागाई कमी करण्यासाठी इंधन दरवाढ मागे घेण्याच्या विविध मागण्यांसाठी बहुजन समाज पार्टीच्या (Bahujan Samaj Party) वतीने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector Office) 13 जुलैला धरणे आंदोलन (Movement) करण्यात येणार आहे.

पक्षाच्या मुंबई (Mumbai) येथील प्रदेश कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती बसपाचे नगर जिल्हाध्यक्ष राजू शिंदे यांनी दिली. मुंबईत झालेल्या या बैठकीसाठी बसपाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. संदीप ताजणे, खासदार विरसिंग, प्रमोद रैना, प्रदेश उपाध्यक्ष चेतन पवार, प्रदेश कार्यालयीन सचिव प्रा. अभिजीत मनवर आदइहसह पक्षाचे सर्व महासचिव, प्रदेश सचिव, जिल्हा प्रभारी, जिल्हाध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती होती. 13 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करोना नियमांचे पालन करुन धरणे आंदोलन केले जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com