बीएसएनएलच्या कार्यालयातून इलेक्ट्रिक साहित्याची चोरी

बीएसएनएलच्या कार्यालयातून इलेक्ट्रिक साहित्याची चोरी

उंबरे |तालुका प्रतिनिधी| Umbare

राहुरी तालुक्यातील खडांबे बुद्रुक येथील बीएसएनएल च्या कार्यालयातून अज्ञात चोरट्यांनी सुमारे 35 हजार रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक वस्तू चोरून नेल्याची घटना 7 ऑक्टोबर रोजी घडली.

सागर सुनील सोनवणे (वय 31) रा. पाईपलाईन रोड, सावेडी, अहमदनगर. हल्ली रा. राहुरी बुद्रुक. यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, दि. 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2022 या दरम्यान कोणीतरी अज्ञात चायेरट्याने राहुरी तालुक्यातील खडांबे बुद्रुक येथील बीएसएनएल कार्यालयाच्या दरवाजाचा कडीकोयंडा उचकटून कार्यालयातील सुमारे 35 हजार रुपये किंमतीच्या इलेक्ट्रिक वस्तू चोरून नेल्या आहेत. सागर सोनवणे यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com