मध्यरात्री फिरणार्‍या ललनेच्या कारनाम्याची संगमनेरात खमंग चर्चा

मध्यरात्री फिरणार्‍या ललनेच्या कारनाम्याची संगमनेरात खमंग चर्चा

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangamner

तिचा दिवस रात्री साडेअकरा नंतर सुरू होतो...ती अचानक बसस्थानक परिसरात येते.. आणि त्याचवेळी तिच्या प्रतिक्षेत काहीजण बसस्थानक परिसरात उभे असतात. ती येते आणि यातील एका सोबत गाडीवर बसून जाते. शरीर विक्रीतून ती मध्यरात्री हजारो रुपये कमवत आहे. शहरातील अनेकजण तिच्या नादी लागल्याने तिच्या कारनाम्याची शहरात खमंग चर्चा ऐकावयास येत आहे. संगमनेर शहरात छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणावर शरीर विक्रीचा व्यवसाय सुरू आहे.

शहरातील अनेक लॉजमध्ये सर्रास हा व्यवसाय सुरू असल्याचे दिसत आहे. संगमनेर शहराबाहेरील अनेक महिला संगमनेरला येऊन हा व्यवसाय करत आहेत. शहरातील बाजारपेठेमध्येही हा प्रकार काही दिवस सुरू होता. याबाबत चर्चा होत असतानाच एक नवीनच प्रकार समोर आला आहे. संगमनेर बसस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक महिला हा व्यवसाय करताना दिसत आहे. रात्री साडे अकरानंतर ती बसस्थानक परिसरात सावजाच्या शोधात फिरत असते.

तिची बसस्थानक परिसरात येण्याची वेळ झाल्याने यावेळेस शहरातील अनेक तरुण बसस्थानक परिसरात फिरताना दिसत आहे. तिने अनेक तरुणांना वेड लावले आहे. ती बसस्थानक परिसरात येतात काही जण तिला आपल्या गाडीवर घेऊन जातात. परिस्थितीचा अंदाज घेऊन सदर महिला आपला कार्यभाग बसस्थानक परिसरातच उरकत असल्याचेही चर्चा आहे. शहरातील काही लोकांसोबतच प्रतिष्ठितांचाही या माहिलेशी संपर्क असल्याची चर्चा आहे. पोलिसांनी वेळीच या महिलेला आवर घालावा, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com