शेतकर्‍यांना लाच मागणार्‍या वीज कर्मचार्‍याचा केला सत्कार!

शेतकर्‍यांना लाच मागणार्‍या वीज कर्मचार्‍याचा केला सत्कार!

सुनील यादवांची गांधीगिरी तुफान व्हायरल

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

शेतकर्‍यांना लाच मागत असलेल्या कर्मचार्‍याचा भाजपा किसान आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सुनील यादव यांनी गांधीगिरीने सत्कार केला. त्याचा व्हिडिओ करून त्यांनी सोशल मीडियात टाकला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियात तुफान गाजला. त्याला लाखो व्ह्यूवर्स मिळाले.

ऑफशोअर इन्फ्रा लिमिटेड कंपनीचा हा कर्मचारी होता. हा व्हिडीओ महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात पोहोचला. अखेर कंपनीच्या वरिष्ठांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला. त्यांच्याकडून या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली. त्या कर्मचार्‍याला निलंबित करण्याबाबत कर्जत येथील महावितरणच्या अधिकार्‍यांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे त्या व्हिडिओचा अजून नेमका काय परिणाम होतो याची उत्सुकता शेतकर्‍यांना आहे.

संबंधित कर्मचारी शेतकर्‍यांना लाच मागत असे. याची माहिती समजल्यावर गांधीगिरी करून त्याचा सत्कार केला. त्यामुळे त्याला चुकीची जाणीव झाली.

- सुनील यादव, जिल्हा सरचिटणीस, भाजपा किसान आघाडी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com