दारु धंदा चालू ठेवण्यासाठी मागितली लाच; सहाय्यक फौजदाराविरुध्द गुन्हा दाखल

दारु धंदा चालू ठेवण्यासाठी मागितली लाच; सहाय्यक फौजदाराविरुध्द गुन्हा दाखल

कोपरगाव | तालुका प्रतिनिधी

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका हॉटेल मध्ये अवैध दारू बाळगणे व दारू विक्रीचा व्यवसाय सुरळीत पुढे चालू ठेवण्यासाठी हप्ता म्हणून १० हजार रुपयांची मागणी...

करून तडजोडअंती पाच हजारांची लाच मागीतल्याच्या कारणावरून सहाय्यक फौजदार रमेश राऊबा जगधने (वय ४५) याच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केल्याने कोपरगाव शहर व तालुक्यात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका हॉटेल मध्ये त्यांना अवैध दारू बाळगणे व दारूचा अवैध व्यवसाय सुरळीत सुरु ठेवण्यासाठी प्रत्येक महिन्यासाठी हप्ता म्हणून १० हजार रुपयांची लाचेची मागणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार रमेश राऊबा जगधने याने केली होती. तडजोडीअंती ५ हजार रुपये हप्ता देण्याचे ठरले.

दि. २८ जुलै रोजी दुपारी १२.३६ ते १.२१ वाजेच्या दरम्यान कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या आवारात सहाय्यक फौजदार रमेश राऊबा जगधने याने हजारांची लाच मागितली होती. याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपीविरोधात लाचलुचपत प्रतिबंध अधिनियम स १९८८ चे कलम ७ प्रमाणे आरोपी सहाय्यक फौजदार रमेश जगधने यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com