लाच प्रकरण; डॉ. खुणे 29 पर्यंत पोलीस कोठडीत

जिल्हा न्यायालयाचा आदेश
लाच प्रकरण; डॉ. खुणे 29 पर्यंत पोलीस कोठडीत

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

आरोग्य सहाय्यकाकडून 80 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या महिला जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रजनी रामदास खुणे यांना

शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता 29 नोंव्हेबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

संगमनेर तालुक्यातील आरोग्य सहाय्यक हे 1 सप्टेंबर 2014 ते 16 जानेवारी 2015 या दरम्यान आजारपणाच्या रजेवर होते. या कालावधीतील त्यांचे वेतन त्यांना मिळाले नव्हते. ते वेतन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. खुणे यांनी मिळून दिले. याबदल्यात तक्रारदार यांच्याकडून 80 हजाराची लाच घेताना डॉ. खुणे यांना लाचलुचपत विभागाच्या नगर पथकाने गुरूवारी अटक केली.

त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. डॉ. खुणे यांचा पुणे येथे बंगला असून त्या बंगलाची तपासणी करणे बाकी आहे, लाचेची रक्कम मोठी असून याबाबत अधिक तपास करणे बाकी असल्याचा युक्तीवाद लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांनी न्यायालयासमोर केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com