अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

वडिलोपार्जित शेतीचे वाटणी पत्राआधारे उतर्यावर नोंद करून देण्यासाठी तक्रारदाराकडून एक हजाराची लाच स्वीकारताना

घुमरी (ता. कर्जत) तलाठी कार्यालयातील खाजगी कर्मचार्यास रंगेहाथ पकडले. सचिन सुरेश क्षीरसागर (वय 35 रा. मिरजगाव ता. कर्जत) असे पकडलेल्या कर्मचार्याचे नाव आहे. नगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने मिरजगाव येथे ही कारवाई केली.

तक्रारदार यांनी त्यांचे घुमरी गावातील वडिलोपार्जित शेतीचे वाटणी पत्र करून त्या आधारे फेरफार नोंद करून उतारा मिळण्याकरीता घुमरी तलाठी यांच्याकडे अर्ज केला होता.

त्याआधारे तलाठी यांच्याकडून फेरफार नोंद करून उतारा मिळून देण्यासाठी तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणारा खाजगी कर्मचारी क्षीरसागर याने तक्रारदार यांच्याकडे एक हजार रूपयांची मागणी केली होती. ही लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पथकाने क्षीरसागर याला रंगेहाथ पकडले.