
वैजापूर |प्रतिनिधी| Vaijapur
अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Ahmednagar Anti-Corruption Division) लाच (Bribe) मागणार्या औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातील (Aurangabad Rural Police Force) एका कॉन्स्टेबलवर कारवाई (Action) केली आहे. रामेश्वर सिताराम काळे (वय 35, चालक पोलीस कॉन्स्टेबल) असे आरोपीचे नाव असून, वैजापूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या गाडीवर चालक म्हणून ते कार्यरत होते.
देशी दारूच्या दुकानाचा (Deshi Alcohol Shop) परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे कार्यालयामार्फत पुढे पाठवायचा नसेल तर 50,000 रुपये देण्याची मागणी या पोलीस कॉन्स्टेबलने केली होती. तर तडजोडीअंती तीस हजारांच्या लाचेची मागणी करुन सदर रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून वैजापूर पोलिसात (Vaijapur Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीकडून (ACB) देण्यात आलेल्या माहितीनुसार, गंगापूरच्या रघुनाथनगर येथे राहणारे 52 वर्षीय तक्रारदार यांच्या भावांच्या नावे गंगापूर तालुक्यातील नेवरगाव येथे अधिकृत परवाना असलेले देशी दारूचे दुकान (Deshi Alcohol Shop) आहे. मात्र दुकानाचे सर्व कामकाज तक्रारदार हे पाहतात. दरम्यान 18 डिसेंबर 2022 रोजी पोलीस कॉन्स्टेबल रामेश्वर सिताराम काळे यांनी तक्रारदार यांची टाटा सुमो गाडी देशी दारूचे 12 बॉक्स घेऊन जात असताना विरगांव पोलीस स्टेशन (Virgav Police Station) हद्दीत पकडली होती. त्यामुळे गाडीमधील दारुचे बॉक्स व गाडी जप्त (Seized) करुन गाडीमध्ये हजर असलेले दोन इसम व दुकानाचे मालक या नात्याने वरील तक्रारदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
या कारवाईनंतर कॉन्स्टेबल काळे यांनी तक्रारदार यांना फोन करुन वैजापूर (Vaijapur) येथे बोलावून घेतले. तसेच तक्रारदार यांना तुमच्याविरुद्ध बेकायदेशीररित्या देशी दारू वाहतूक करण्याचा गुन्हा दाखल (Filed a Case) झाला आहे. त्यामुळे दुकानाचा परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत पुढे पाठवायचा नसेल तर, 50 हजारांची लाच देण्याची मागणी केली. मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अहमदनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.