नियम तोडत नेवासाफाटा येथे भरला आठवडे बाजार

नियम तोडत नेवासाफाटा येथे भरला आठवडे बाजार

नेवासाफाटा (प्रतिनिधी) - संपूर्ण राज्यात संचारबंदीसह लॉकडाऊन असताना नेवासाफाटा येथे काल गुरुवारी आठवडे बाजार भरला.

सध्या राज्यात करोनाचे थैमान पाहून कडक लॉकडाऊन ची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. जीवनावशक बाबी सोडून सर्वत्र एक मे पर्यंत बंद पुकारलेला आहे.

परंतु नेवासा फाटा येथील आठवडे बाजार भरला असलेचे चित्र पाहवयास मिळाले. कोणतेही सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता हा बाजार भरला. मुकिंदपूर ग्रामपंचायतने परिसरात रिक्षा फिरवून बाजार भरणार नाही. शेतकर्‍यांनी भाजीपाला आणू नये असे दोन दिवसापूर्वी आवाहन केले होते. परंतु परिसरातील व्यापार्‍यांनी नामी शक्कल लढवून बाजारातळाची जागाच बदलून बाजार भरविला.

या बाजारामध्ये एकही शेतकरी भाजीपाला विकण्यास आला नाही हे विशेष. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी व्यापार्‍यांना समजावण्याचा प्रयत्न केला परंतु उपयोग झाला नाही. तसेच भाजीपाल्याचे भाव सुद्धा अव्वाचे सव्वा पाहवयास मिळाले. सर्वत्र बंद, परत भाजीपाला मिळतो की नाही यामुळे जो भाव असेल त्या भावात लोक खरेदी करताना दिसत होते. बाजारही सकाळी दोन तासात गुंडाळला. मुकिंदपूरचे सरपंच सतीश निपूंगे यांनी फाटयावरील व्यापार्‍यांना दुकाने उघडू नका, गर्दी करू नका, तहसीलदार यांचे आदेश पाळा असे आवाहन केले. त्याचे पालन सुद्धा होत आहे. परंतु पुढील आठवड्यात बाजारही बंद होईल अशी अपेक्षा सुज्ञ नागरिक करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com