अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

लॉक केलेल्या कारची काच फोडून कारमधील 2 लाख 55 हजार रूपयांची रक्कम चोरून नेली.

सर्जेपुरा चौक ते अप्पु हत्ती चौक रस्त्यावरील सुदर्शन निवास समोर बुधवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी गणेश लक्ष्मण ताठे (वय 49 रा. भुतकरवाडी) यांनी गुरूवारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कांदा व्यवसायिक आहे.

त्यांनी बुधवारी त्यांच्या कारमध्ये (एमएच 16 एटी 9651) 2 लाख 55 हजार रूपयाची रक्कम कारच्या मागील शिटावर बॅगमध्ये ठेवली होती. चोरट्यांनी कारची काच फोडून रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके करीत आहे.