शहरातील मुख्य रस्ते फोडून होणार गॅस पाईपलाईनचे काम

श्रीगोंदा भाजप पदाधिकार्‍यांची जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार
File Photo
File Photo

श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda

श्रीगोंदा शहरातून जात असलेल्या गॅस पाईपलाईनसाठी शहरातील मुख्य रस्ते फोडण्याची जयारी नगर पालिकेने केली आहे. मात्र यास भाजपच्या पदाधिकार्‍यांनी विरोध केला असून जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केल्याची माहिती भाजपच्या नगरसेवक मनीषा वाळके व भाजपचे जिल्हा कार्यकर्ते संतोष इथापे यांनी दिली.

भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेड कंपनीची सीएनजी पाईपलाईन श्रीगोंदा येथून औरंगाबादकडे जात आहे. यासाठी ठेकेदार अनेक विभागांच्या परवानग्या न घेता काम करत करत असल्याचे आरोप केले जात आहेत. अशातच शहरात श्रीगोंदा नगरपालिकेच्या ऐठकीत बायपास सह अन्य रस्ता फोडून पाईपलाईन नेण्यासाठी पालिकेचा ठराव प्रलंबित आहेत. त्यास परवानगी देण्याची तयारी सत्ताधार्‍यांनी केली आहे. नगरपालिकेच्या 4 मे 2022 च्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक 15 मध्ये गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी ना हरकत देण्याचा ठराव करण्याची आणि पुढील सभेत ठराव मंजूर करण्याचे ठरले आहे.

कंपनीच्या नुसत्या पत्रावर नगरपालिकेने अगोदरच रस्ता रिस्टोअर करण्यासाठी खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले आहे. गॅस पाईपलाईन रस्त्याच्या कडेने नेण्यात यावी.भारत गॅस रिसोर्सेस कंपनीने पर्यायी मार्गाने पाईपलाईन न्यावी. शहरालगत रस्त्यातुन गॅस पाईपलाईन नेणे धोक्याचे आहे.भारत गॅस कंपनीच्या पाईपलाईन साठी पालिकेने कुठले ही ठराव करू नयेत यासाठी जिल्हाधिकारी यांना तक्रार अर्ज भाजप नगरसेविका मनीषा सुनील वाळके यांनी तसेच भाजपचे जिल्हा सह सचिव संतोष इथापे यांनी दिली आहे.

नदीतील खोदकामाची जबाबदारी पालिकेचीच

नदीपात्रात कुठले खोदकाम करण्यासाठी परवानगी ही जलसंपदा विभागासह स्थानिक स्वराज्य संस्था म्हणुन श्रीगोंदा पालिकेकडून घेणे गरजेचे आहे. जलसंपदा विभाग केवळ पूररेषा ठरवत असते जर नदी पात्रात अडथळा निर्माण होऊन काही हानी झाली तर ती जबाबदारी स्थानिक संस्थेची असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे संबंधित ठेकेदार नेमकी कुणाची परवानगी घेऊन काम करत आहेत असा सवाल तक्रारदारांनी उपस्थित केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com