पाण्याचे अनधिकृत कनेक्शन तोडा

केडगाव शिवसैनिकांची मनपाकडे मागणी
पाण्याचे अनधिकृत कनेक्शन तोडा

अहमदनगर (प्रतिनिधी)

महापालिकेच्यावतीने (Ahmednagar Municipal Corporation) केडगावला (Kedgoan) पाणीपुरवठा (Water supply) करणारी जलवाहिनी अनधिकृतरित्या फोडून महावीर ड्रिम सिटीला (Mahavir Dream City) जोडण्यात आलेली आहे.

जोडण्यात आलेली वाहिनी तब्बल ५ इंचाची आहे. हे कनेक्शन तत्काळ बंद करण्याची मागणी केडगावमधील शिवसेना (Shivsena) नगरसेवक विजय पठारे (Vijay Pathare), अमोल येवले (Amol Yeole), सुनीता कोतकर (Sunita Kotkar), तसेच संग्राम कोतकर (Sangram Kotkar) व शिवसैनिकांनी निवेदनाद्वारे आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे केली आहे.

पाण्याचे अनधिकृत कनेक्शन तोडा
रोपवेचा भीषण अपघात, हवेत लटकले ४८ लोक; लष्कराकडून बचाव कार्य सुरु, पाहा व्हिडिओ

केडगावचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मार्च महिन्यात झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ड्रिम सिटीला दिले गेलेल्या पाण्याच्या कनेक्शनविषयी प्रश्न उपस्थित केला होता. हे कनेक्शन केडगावला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीतून अनधिकृतरित्या जोडले असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. मात्र, मनपा अधिकारी हे मान्य करण्यास तयार नव्हते.

वास्तविक, मेनलाईनला छोटी-मोठी काय कुठलेच कनेक्शन जोडताच येत नाहीत. मुख्य जलवाहिनी फक्त पिण्याचे पाणी वितरित करणाऱ्या मुख्य पाण्याच्या टाकीसाठी असते. सभेनंतर नगरसेवक व शिवसैनिकांनी स्पॉटला व्हिजिट देऊन पाहणी केली. यात ही बाब निदर्शनास आली आहे.

पाण्याचे अनधिकृत कनेक्शन तोडा
अभिनेत्री सोनम कपूरच्या घरात चोरी, 'इतक्या' कोटीचे रक्कम आणि दागिने लंपास

मुख्य जलवाहिनीला जोडून केडगावचे हक्काचे पाणी चोरून वापरणारे व यासाठी जबाबदार असणाऱ्या मनपा अधिकारी व पदाधिकाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच ड्रिम सिटी प्रकल्पाला केडगाव पाईपलाईनमधून देण्यात आलेले अनधिकृत कनेक्शन तात्काळ तोडावे, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना देता नगरसेवक, शिवसैनिक व केडगावची जनता सदर कनेक्शन केडगाव पाईपलाईन ते ड्रिम सिटीपर्यंत जेसीबीच्या साहाय्याने उखडून टाकू, असा इशारा दिला आहे.

Related Stories

No stories found.