नेवाशात करोना बाधितांच्या संख्येला ब्रेक!

एकूण करोना संक्रमितांची संख्या 772 झाली आहे.
नेवाशात करोना बाधितांच्या संख्येला ब्रेक!

नेवासा | प्रतिनिधी | Newasa

नेवासा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून करोना संक्रमिताची संख्या झपाट्याने वाढत असताना आज या संख्येला ब्रेक लागला. काल मंगळवारी तालुक्यात

अवघा एक रुग्ण करोना संक्रमित आढळून आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिराज सूर्यवंशी यांनी दिली.

नेवासा तालुक्यात मागील काही दिवसांपासून करोना संक्रमितांची संख्या दररोज वाढत चालली आहे, 26 तारखेला तालुक्यात दहा संक्रमित आढळले होते. 27 रोजी 13 रुग्ण, 28 ऑगस्टला 18, 19 ऑगस्ट रोजी 35, 30 ऑगस्ट रोजी 34 तर काल सोमवारी 23 रुग्ण आढळून आले होते, आज मंगळवारी मात्र चाचण्यांमध्ये जेऊर येथील एकमेव रुग्ण पॉझिटिव आला. या रुग्णामुळे तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 772 झाली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com