ब्राम्हणीतून तरूणाचे अपहरण करून बेदम मारहाण

राहुरीत 11 जणांवर गुन्हा दाखल
ब्राम्हणीतून तरूणाचे अपहरण करून बेदम मारहाण

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

मुलगी पळवून नेली म्हणून राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील बाळासाहेब लांघे या तरूणाचे नगर येथील अकरा जणांनी मिळून

ब्राम्हणी येथून दि. 4 एप्रिल रोजी अपहरण केले. त्यानंतर त्याला दगडाने व लाथाबुक्कयांनी जबरदस्त मारहाण करून नगर येथे जखमी अवस्थेत सोडून देण्यात आले.

बाळासाहेब विठ्ठल लांघे (वय 27 वर्षे) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 4 एप्रिल रोजी संध्याकाळी साडेसात वाजे दरम्यान ब्राम्हणी गावातील आदर्श शाळेच्या ओट्यावर फिर्यादी लांघे व त्यांचे मित्र गप्पा मारत बसले होते. यावेळी अचानकपणे येऊन काहीएक विचारपूस न करता आरोपींनी लांघे यांना लाथाबुक्कयांनी मारहाण करु लागले. त्यावेळी लांघे हे त्यांच्या तावडीतून निसटून पळून जात असताना गेटसमोर उभ्या असलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडीमधील आरोपींनी बाळासाहेब यांना धरले.

तू पळाला तर तुला गोळ्या घालीन, असा दम दिला. त्याचवेळी सर्व आरोपींनी त्यांना पकडून बळजबरीने गाडीमध्ये बसवून ब्राम्हणी गावातून राहुरी मार्गे नगरकडे मारहाण करत नेले. राजी 8.30 ते 9 वाजे दरम्यान बाबुर्डी घुमट शिवारात रस्त्याच्या बाजूला गाडीतून खाली उतरवून लांघे यांचे हातपाय धरुन आरोपींनी त्यांच्या पायाच्या नडगीवर दगडाने तसेच लाथाबुक्कयांनी जबरदस्त मारहाण केली. त्यानंतर पुन्हा गाडीत घालून त्यांना त्यांची बहीण सौ. मिरा नवनाथ वायखंडे (रा. कोंबडीमळा ता. जि. नगर) यांच्या घरासमोर गाडीतून टाकून आरोपी निघून गेले. असे फिर्यादीत म्हटले आहे.

लांघे याच्या फिर्यादीवरून आरोपी खंडू काळे, मनोज निमसे, भरत गोरख काळे, नंदु गोरख काळे, अंकुश हरिभाऊ काळे, अमोल जालिंदर काळे, सर्व रा. बुरडगाव ता. नगर, पिनू दरेकर (पूर्ण नाव माहित नाही, रा. रेल्वे स्टेशन, विटभट्टी शेजारी, लोखंडी ब्रीजजवळ ता. नगर), रवी घिसाडी (पूर्ण नाव माहीत नाही, रा. नागापूर एमआयडीसी ता. नगर), विनोद (पूर्ण नाव माहीत नाही, रा. बुरुडगाव ता. नगर व एक काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकल वरील दोन अज्ञात इसम नाव पत्ता माहीत नाही. अशा एकूण अकरा जणांवर गु. र. नं. 295/2021 भादंवि कलम 326, 363, 143, 147, 148, 149, 323, 504, 508 प्रमाणे अपहरण व जबरदस्त मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com