ब्राम्हणीत नांगरणीवरून तरूणावर कोयत्याने वार

ब्राम्हणीत नांगरणीवरून तरूणावर कोयत्याने वार

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे शेतात नांगरणी करण्याच्या कारणावरून मुसा पठाण या तरूणावर कोयत्याने वार करून गजाने बेदम मारहाण करत जखमी केले. ही घटना दि. 25 मे रोजी घडली आहे. याबाबत सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुसा मेहबूब पठाण (वय 36 वर्षे रा. ब्राम्हणी ता. राहुरी) याने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, दि. 25 मे रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ब्राम्हणी येथील शेती गट नंबर 38/1 येथे शेत नांगरणी करण्याच्या कारणावरून मुसा पठाण याच्यावर पाच जणांनी मिळून कोयत्याने वार केले. तसेच गज व लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले आणि जिवे मारण्याची धमकी दिली.

पठाण याच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी शब्बीर मिरसाहब शेख, नवाब मीरसाहब शेख, नसीर शेख, सद्दाम शब्बीर शेख, अल्ताफ नवाब शेख व सुन्ना अहमद शेख (सर्व राहणार ब्राह्मणी तालुका राहुरी) या सहा जणांवर जबर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास हवालदार पारधी करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com