ब्राम्हणीच्या धर्मांतर प्रकरणातील त्या धर्मगुरुविरुध्द विनयभंगाची तक्रार

ब्राम्हणीच्या धर्मांतर प्रकरणातील त्या धर्मगुरुविरुध्द विनयभंगाची तक्रार

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

मागील आठवड्यात राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथे एका महिलेचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या एका धर्मगुरूविरूद्ध विनयभंगाची तक्रार राहुरी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मागील आठवड्यात ब्राम्हणी येथे पंजाबहून एक धर्मगुरू धर्मांतरणासाठी आला होता. त्याने तेथील एका 55 वर्षीय महिलेला पैशाचे आणि अन्य लालच दाखवून तिला धर्मांतर करण्याचे सांगितले. यावेळी त्या धर्मगुरूने त्या महिलेला लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केल्याचा आरोप त्या महिलेने दिलेल्या तक्रार अर्जात केला आहे.

दरम्यान, याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते. त्या धर्मगुरूने ब्राम्हणी गावात धर्मांतर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले होते. त्यांनी ही घटना तातडीने राहुरी पोलिसांना कळविल्यानंतर त्याठिकाणी राहुरीचे पोलीस दाखल झाले. मात्र, राहुरी पोलिसांनी याप्रकरणाची दखल घेतली नसल्याने ब्राम्हणी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. आता त्या महिलेने धर्मगुरूविरूद्धच विनयभंगाची तक्रार केल्यानंतर अद्यापही पोलिसांनी त्या महिलेच्या तक्रार अर्जाची दखल घेतली नसल्याने पोलिसांच्या संशयास्पद भुमिकेमुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.