आधी कोंबड्या आता बोकड्यासह शेळी केली ठार !

बोटा गावठाणात बिबट्याचा वावर; वनविभागाने लावला पिंजरा
आधी कोंबड्या आता बोकड्यासह शेळी केली ठार !

घारगाव |वार्ताहार| Ghargav

संगमनेर तालुक्याच्या (Sangamner Taluka) पठारभागातील बोटा (Bota) येथे गावठाणात बिबट्याने (Leopard) अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. शनिवारी पहाटे सव्वातीन वाजेच्या सुमारास सुमन दिनकर उकिर्डे यांच्या घराजवळी सपरात घुसून बिबट्याने बोकड (Buck) व शेळीवर हल्ला (Goat Attack) करत ठार केले. तर दोन दिवसांपूर्वीच बिबट्याने (Leopard) मोठ्या प्रमाणात कोंबड्याही (Hens) फस्त केल्या होत्या त्यामुळे बोटा (Bota) गावाठाणात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

बोटा (Bota) गावाठाणातील जुनी बाजार गल्ली गणपती मंदिराच्या पाठीमागे सुमन उकिर्डे यांचे राहते घर आहे. त्यांच्या घराशेजारी सपार असून त्यांनी सपरात बोकड (Buck) व शेळीला (Goat) बांधले होते. शनिवारी पहाटे बिबट्याने (Leopard) सपरात घुसून बोकड व शेळीवर हल्ला (Goat Attack) करत ठार केले. सकाळी या घटनेची माहिती समजताच वनरक्षक दिलीप उचाळे व बाळासाहेब वैराळ यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच बिबट्याने उकिर्डे यांच्या 25 कोंबड्याही फस्त केल्या आहेत. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी तत्काळ या परिसरात पिंजरा लावावा, अशी मागणी सुमन उकिर्डे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली होती. त्यानंतर काही तासातच वनविभागाने पिंजरा लावला आहे. मात्र गावठाण परिसरात बिट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Related Stories

No stories found.