मराठा आरक्षण रद्द झाल्याने राहुरीत बोंबाबोंब आंदोलन

मराठा आरक्षण रद्द झाल्याने राहुरीत बोंबाबोंब आंदोलन
मराठा आरक्षण

राहुरी (प्रतिनिधी)

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे. राज्य सरकारने केलेला कायदा वैध नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुरी येथे अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.

मराठा आरक्षण
मोठी बातमी! मराठा आरक्षण रद्द

अ.भा.छावाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक देवेंद्र लांबे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्याच्या निर्णयामुळे मराठा समाज मोठ्या प्रमाणावर दुखावला आहे. सरकार मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात कुठेतरी कमी पडले आहे. त्यामुळेच मराठ्यांचे आरक्षण न्यायालयात टिकू शकलेले नाही.

राज्य आणि केंद्र या दोन्ही सरकारने समन्वयातून मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी मार्ग काढावा.करोना प्रादुर्भावामुळे शासकीय यंत्रणेवर अधिक ताण पडू नये, म्हणून निवडक कार्यकर्त्यांसह प्रातिनिधीक स्वरुपात बोंबाबोंब आंदोलन केले. भविष्यकाळात वेळीच मराठा समाजाला योग्य न्याय न मिळाल्यास समाजाचा उद्रेक होऊन सरकारला मोठी किंमत मोजावी लागणार आहे, असे लांबे म्हणाले. यावेळी अ.भा.छावाचे जिल्हाप्रमुख नितीन पटारे, अमोल वाळूंज, अविनाश क्षीरसागर, अशोक धसाळ आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com