
अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar
बोल्हेगाव (Bolhegav) उपनगरातील एका 22 वर्षीय युवकाने (Youth) सोमवारी (दिनांक 13 फेब्रुवारी) सायंकाळी सात वाजता गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
राहुल सतीश लोंढे (वय 22) असे मृत युवकाचे नाव आहे. राहुल याने घरात गळफास घेतला. त्याला उपचारासाठी सावेडीतील (Savedi) एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे घोषित केले.
या खासगी रूग्णालयाने दिलेल्या खबरीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात (Topkhana Police Station) आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.