बोल्हेगावातील रस्त्याचे काम मार्गी लागणार

स्थायीच्या सभेत निविदा मंजुरीसाठी अजेंड्यावर
बोल्हेगावातील रस्त्याचे काम मार्गी लागणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत दयनीय अवस्था झालेल्या बोल्हेगाव रस्त्याचे काम मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. येत्या सोमवारी स्थायी समितीची सभा होत असून यात या रस्त्याच्या कामाची निविदा मंजुरीसाठी अजेंड्यावर घेण्यात आली आहे.

सोमवारी होत असलेल्या सभेत बोल्हेगाव रस्त्याच्या कामाची निविदा, केडगाव येथील भैरवनाथ पतसंस्था ते पाच गोडाऊन ते शाहूनगर बस स्टॉप पर्यंत रस्त्याच्या कामाची निविदा, शहरातील गटार ड्रेनेज व चेंबर दुरूस्तीच्या कामाच्या प्रभाग समितीनिहाय काढण्यात आलेल्या निविदा, नालेसफाई रस्त्यावरील साफसफाई आदी घनकचरा विभागाच्या कामांसाठी कंत्राटी पध्दतीने मजूर पुरवण्याबाबत मागविण्यात आलेल्या निविदा, ढवण वस्ती, तपोवन परिसर, कसबे वस्ती परिसरात पाईपलाईन टाकण्याच्या कामाची निविदा आदी प्रमुख निविदा मंजुरीसाठी अजेंड्यावर घेण्यात आल्या आहेत.

तसेच नवीन जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शहर बससेवा सुरू करणे, सिंडिकेट येथील मनपाच्या शाळेतील सभागृह सामाजिक संस्थेस चालविण्यास देणे, मनपाच्या विविध विभागातील रुग्णालयातील कंत्राटी कर्मचार्‍यांना मुदतवाढ देणे आदी विषयही सभेसमोर मान्यतेसाठी घेण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com