
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
बोल्हेगाव उपनगरातील गांधीनगर येथे घरात सुरू असलेल्या तिरट जुगारावर तोफखाना पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणी जुगार खेळणार्या चौघांना पकडले. शनिवारी सायंकाळी ही कारवाई केली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अंमलदार सचिन जगताप यांनी फिर्याद दिली आहे.
शुभम संतोष माळवे (वय 21 रा. खुलताबाद, जि. औरंगाबाद, हल्ली रा. चोबे कॉलनी, बोल्हेगाव), सखाराम गोरक्षनाथ मोरे (वय 38 रा. सुरेगाव ता. श्रीगोंदा, हल्ली रा. चोबे कॉलनी, बोल्हेगाव), सुधीर रमेश गायकवाड (वय 49 रा. हिंगोणी कांगोणी ता. नेवासा, हल्ली रा. गणेश चौक, बोल्हेगाव), ज्ञानदेव गुलाब कांबळे (वय 48 रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
त्यांच्याकडून रोख रक्कम, दुचाकी, तिरट जुगाराचे साहित्य असा एक लाख 18 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बोल्हेगावच्या गांधीनगर येथे आबा भंगारवाल्याचे समोर घरामध्ये काही इसम तिरट जुगार खेळत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांना मिळाली होती. त्यांनी उपनिरीक्षक समाधान सोळुंके, अंमलदार दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, संदीप धामणे, जगताप यांच्या पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या. पथकाने शनिवारी सायंकाळी पंचासमक्ष बातमीतील नमूद ठिकाणी छापा टाकला असता त्यांना चौघे तिरट जुगार खेळताना मिळून आले. त्यांची अंगझडती घेतली असता एक लाख 18 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.