बोल्हेगाव परिसरात मनपाचे स्वच्छता अभियान

बोल्हेगाव परिसरात मनपाचे स्वच्छता अभियान

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्वच्छतेतून समृद्धीकडे घेऊन जायचे असेल तर स्वच्छतेला (Clean) महत्व देणे गरजेचे आहे. यासाठी अहमदनगर मनपाच्यावतीने (Ahmednagar Municipal Corporation) दर महिन्याच्या 30 तारखेला शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता अभियान (Cleaning Campaign) राबवले जाते. समाजामध्ये स्वच्छता अभियानातून हे लोक चळवळ होण्यास मदत होईल, असा विश्वास उपमहापौर गणेश भोसले (Deputy Mayor Ganesh Bhosale) यांनी व्यक्त केला.

मनपाच्या वतीने बोल्हेगाव गावठाण (Bolhegav) परिसरात स्वच्छता अभियान (Cleaning Campaign) राबवण्यात आले यावेळी उपमहापौर भोसले, स्थायी समिती सभापती कुमार वाकळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, उपायुक्त श्रीनिवास कुरे, स्वच्छता निरीक्षक किशोर देशमुख, पाणीपुरवठा अधिकारी रोहिदास सातपुते, मुन्ना शेख, प्रशांत बेलेकर आदी उपस्थित होते.

नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यासाठी स्वच्छता अभियान राबवणे गरजेचे असल्याचे मत सभापती वाकळे यांनी व्यक्त केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com