घर फोडून तीन तोळे, 57 हजारांची रक्कम लांबवली

बोल्हेगावातील घटना; तोफखान्यात गुन्हा
घर फोडून तीन तोळे, 57 हजारांची रक्कम लांबवली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बोल्हेगाव उपनगरातील पोलीस कॉलनीत असलेले घर, किराणा दुकान फोडून चोरट्यांनी 57 हजारांची रोख रक्कम, तीन तोळे सोन्याचे दागिने व 900 ग्रॅम चांदी असा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत पोपटलाल चोपडा (वय 28 रा. बोल्हेगाव, पोलीस कॉलनी, नंदनवननगर, मूळ रा. वाटेफळ ता. नगर) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचे बोल्हेगावातील नंदनवननगरमध्ये स्वत: चे घर आहे. घरासमोर किराणा दुकान आहे. फिर्यादी यांनी 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता किराणा दुकान बंद करून शेटरला लॉक लावले होते. घराला व कंपाऊंडला लॉक लावले होते. ते वाटेफळ या त्यांच्या मूळ गावी गेले होते.

यानंतर चोरट्यांनी किराणा दुकान, घर, कंपाऊंटचे लॉक तोडून आत प्रवेश केला. सामानाची उचकापाचक करून 57 हजार रुपये रोख रक्कम, तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने व 900 ग्रॅम चांदी असा ऐवज लंपास केला. फिर्यादी यांना 16 नोव्हेंबर रोजी सकाळी सात वाजता ही घटना समजली. त्यांनी तत्काळ तोफखाना पोलिसांना माहिती देत गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com