Corona
Corona
सार्वमत

बोधेगावात करोना बाधित पहिला रुग्ण आढळला

11 ऑगस्टपर्यंत बोधेगाव बंद; 25 जण तपासणीसाठी ताब्यात

Arvind Arkhade

बोधेगाव |वार्ताहर| Bodhegav

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे एक पहिला करोना पॉझिटिव्ह रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने एकच खळबळ उडाली गेली आहे. 75 वर्षीय पुरुष व्यक्तीला त्रास होऊ लागल्याने खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र करोना सदृश्य लक्षण दिसत असल्याने पुढील उपचारासाठी शेवगाव येथे केव्हीड सेंटरमध्ये तपासणीसाठी दोन दिवसांपूर्वी दाखल केले.

तपासणी केली असता करोना पॉझिटिव्ह निघाल्याने बाजार पेठेच्या बोधेगावात खळबळ उडाली गेली आहे. लागण झालेली व्यक्ती रोज अनेक किती लोकांच्या संपर्कात येत होता याची प्रशासनाला धास्ती वाढली आहे.

बोधेगाव येथील बाधीत कुटुंबातील 13 जणांना व कांबीतील 12 असे एकूण 25 जण शेवगाव येथील त्रिमूत्री कोव्हीडं केयर सेंटरमध्ये तपासणीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य विभाग डॉ. संदीप घुले यांनी दिली.

बोधेगाव येथे रुग्ण आढळून आल्याने संसर्ग वाढू नये म्हणून शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांनी काल रविवारी सायंकाळी 12 वाजल्या पासून दि 11 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केले आहे त्यामध्ये बँक, सरकारी कार्यलय, मेडिकल्स, दवाखाना, कृषी सेवा केंद्र वगळून इतर व्यवसाय दहा दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे बाहेर जाणे येणे बंद कण्याचा निर्णय घेतला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com