अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने शेवगाव तालुक्यातील (Shevgav Taluka) बोधेगाव (Bodhegav) येथील जुगार अड्ड्यावर छापा (Gambling Raid) टाकून दोघांना ताब्यात घेतले. दोन जण पसार होण्यात यशस्वी झाले. बबन बाळासाहेब ढेसले (वय 38), जिगरा सुरेश आंगरख (वय 20 दोघे रा. बोधेगाव ता. शेवगाव) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहे.
तर नारायण सखाराम भोंगळे, भगवान मिसाळ (पुर्ण नाव माहीत नाही दोघे रा. बोधेगाव) असे पसार झालेल्यांची नावे आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून 11 हजार 200 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौघांविरूद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
बोधेगावमध्ये जुगार (Bodhegav Gambling) सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके (LCB PI Anil Katake) यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस अंमलदार संतोष लोढे, शंकर चौधरी, आकाश काळे यांना कारवाईचे आदेश दिल्याने पथकाने बोधेगावात छापा (Bodhegav Raid) टाकून कारवाई केली. पुढील तपास शेवगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार बडदे करीत आहे.