पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनवर घेतला बोअर

मेनरोड परिसरात तीन दिवस पाणीच नाही
पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनवर घेतला बोअर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

नगर परिषदेच्या (Shrirampur Municipal Council) पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनवर (Drinking water pipeline) चक्क बोअर (Boer) घेतल्याने मेनरोडवर राहत असलेल्या नागरिकांना तीन दिवस पाणीपुरवठा झाला नाही.

मेनरोडवर एका दुकानासमोर पालिकेचा फुटपाथ आहे. या फुटपाथच्या खाली पिण्याची पाईपलाईन (Drinking pipeline) टाकलेली आहे. मागील आठवड्यात दुकान मालकांनी रात्रीं बोअर घेण्यास सुरुवात केली. काही वेळातच बोअरमधून (Boer) पाणी येवू लागले. पाच फुटांच्या आत पाणी लागल्याचा सर्वांना आनंद झाला. मात्र बोअर (Boer) घेणार्‍यांना लोखंडाचे तुकडे मातीबरोबर बाहेर पडताना दिसले.

याठिकाणी पाण्याची पाईपलाईन (Water Pipeline) असल्याचे समजले. याठिकाणी सुरू असलेला बोअर थांबविण्यात आला. दुसर्‍या दिवशी पालिकेच्या कर्मचार्‍यांनी पाईपलाईन दुरुस्ती सुरू केली. पाईपलाईन दुरुस्त झाल्यावर चौथ्या दिवशी मेनरोडवर राहणार्‍या नागरिकांना पिण्याचे पाणी मिळाले.

पिण्याच्या पाईपलाईनवर बोअर घेतल्याची घटना गंभीर आहे. याचे भान पालिका कर्मचार्‍यांना नाही. चार दिवस नागरिकांना पिण्याचे पाणी मिळाले नाही, कुठलीही परवानगी न घेता बोअर घेणार्‍यांवर कुठलीही कारवाई केली नाही. उलट ही जागा खाजगी आहे, असा जावईशोध पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख प्रशांत पाठे यांनी लावला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com