ब्लेडने वार करीत युवकाला लुटले

नांदगावची घटना || तिघांविरूध्द गुन्हा
ब्लेडने वार करीत युवकाला लुटले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

घरात झोपलेल्या मुलावर ब्लेडने वार करून त्याच्या पाकिटामधील दोन हजारांची रक्कम लुटली. रविवारी (दि. 3) रात्री साडे अकराच्या सुमारास नांदगाव (ता. नगर) येथील पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली. याप्रकरणी शिवाजी जगन्नाथ पुंड (वय 38) यांनी सोमवारी (दि. 4) दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अनोळखी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. शिवाजी पुंड यांचा मुलगा ओमकार घराचा दरवाजा बंद करून झोपी गेला होता. रात्री साडे अकराच्या सुमारास तीन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. ओमकारवर ब्लेडने वार करून धमकी दिली. बळजबरीने किचनचा दरवाजा उघडण्यास सांगून रॅकवर ठेवलेल्या पाकिटातील दोन हजार रुपयांची रक्कम चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, शिवाजी पुंड यांनी दुसर्‍या दिवशी सोमवारी एमआयडीसी पोलिसांना याबाबत माहिती देत गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com