VIDEO : पिंपरी निर्मळमध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

VIDEO : पिंपरी निर्मळमध्ये पट्टेरी वाघाचे दर्शन, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
प्रातिनिधिक फोटो

पिंपरी निर्मळ | वार्ताहर

राहाता (Rahata) तालुक्यातील पिंपरी निर्मळ (Pimpari Nirmal) येथे पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. वाघाच्या दहशती मुळे सातचा आत घरात बंदीस्त होण्याची वेळ वाडया वस्त्यावरील नागरीकांना आली आहे.

पिंपरी निर्मळ परीसरात गेल्या अनेक दिवसांपासुन बिबटयाची दहशत आहे. गावातील बहुंताश सर्वच वाडया वस्त्यावरील भागात बिबटयाचे दर्शन नागरीकांना झाले आहे. अनेक पाळीव कुत्रे व शेळयांचा फडशा या बिबटयांनी पाडला आहे. या दहशतीमुळे वस्त्यावरील नागरीकांना अंधार पडायच्या आत घर गाठावे लागावे लागत आहे. बिबटया पाठोपाठ आता निर्मळ वस्तीवरील राजेद्र निर्मळ यांच्या शेताच्या कडेला असेल्या मंदीराजवळ भरदिवसा पट्टेरी वाघ आढळला आहे.

वस्तीवरील तरूणांनी टॅक्टर वर बसुन हा व्हीडीओ मोबाईल मध्ये काढला आहे. परीसरात बिबट्यांनंतर पट्टेरी वाघ आढळल्याने रहीवाशांमध्ये भितीचे वतावरण आहे. येथे मोठी लोकवस्ती असल्याने वन विभागाने तातडीने पिंजरा लावुन या पट्टेरी वाघाला पकडुन सुरक्षित अधिवासात सोडावे अशी मागणी राहाता तालूका युवक कॉग्रेसचे अध्यक्ष राजेद्र निर्मळ यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com