काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा 25 टन तांदूळ जप्त

दोघांवर गुन्हा दाखल
काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा 25 टन तांदूळ जप्त

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

सुमारे पाच लाख रुपये किमतीचा तांदूळ (Rice) काळा बाजारात (Black Market) विक्री करण्यासाठी जात असताना राहुरी पोलिसांनी छापा (Rahuri Police Raid) टाकून सदर तांदूळ (Rice) व एक ट्रक (क्र.एमएच 16 सीसी 4511) असा सुमारे 35 लाखांचा मुद्देमाल जप्त (Seized) करून ताब्यात घेतला आहे. याबाबत राहुरी पोलीसांनी (Rahuri Police) दोघांवर गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.

काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा 25 टन तांदूळ जप्त
श्रीरामपूर, राहुरी, राहाता, कोपरगावात तालुक्यात सौम्य धक्के

दिनांक 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजे दरम्यान राहुरी पोलिसांना गुप्त खबर्‍या मार्फत खबर मिळाल्याने राहुरी पोलिस पोलिस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा, पोलिस नाईक सचिन ताजणे, नदीम शेख, शशिकांत वाघमारे आदि पोलिस पथकाने राहुरी फॅक्टरी ते देवळाली प्रवरा दरम्यान सदर ट्रकचा पाठलाग करून ट्रक पकडला. ट्रकमधील चालक व वाहकाकडे चौकशी केली असता ट्रकमध्ये रेशनचा तांदुळ असल्याची शंका पोलीसांना आली.

काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा 25 टन तांदूळ जप्त
चारचाकीसाठी तिहेरी तलाक!

त्यावेळी पोलिस पथकाने 5 लाख 4 हजार रूपये किंमतींचा सुमारे 25 टन तांदूळ (Rice) व 30 लाख रूपये किंमतीचा मालट्रक (Truck) असा एकूण सुमारे 35 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त (Seized) करून राहुरी पोलिस ठाण्यात आणण्यात आला. याप्रकरणी पोलिस नाईक सचिन ताजणे यांच्या फिर्यादीवरुन देवळाली प्रवरा (Deolali Pravara) येथील सुनिल चांगदेव गल्हे, वय 43 वर्षे, तसेच ट्रक चालक उध्दव अर्जुन खाडे, वय 43 वर्षे, राहणार दरखवाडी, ता. जामखेड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणारा रेशनचा 25 टन तांदूळ जप्त
नगरच्या ‘शंकर’चा फोन खणखणताच संगमनेरातील अवैध व्यवसाय बंद
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com