रेशन धान्याचा काळाबाजार, कर्जतमध्ये दोन वाहने पकडली

रेशन धान्याचा काळाबाजार, कर्जतमध्ये दोन वाहने पकडली

कर्जत |वार्ताहर| Karjat

रेशनिंगचा काळाबाजारात जाणारा तांदूळ, गहू कर्जत पोलिसांनी पकडला. 82 गोण्या तांदूळ, 8 गोण्या गहू, दोन चारचाकी वाहने असा 10 लाख 44 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. मंगळवारी राशीन- कर्जत रोडवर पोलिसांनी ही कारवाई केली.

तिघांविरूद्ध गुन्हे दाखल केले असून त्यांना अटक केली आहे. बाळासाहेब दादासाहेब ढेरे (वय 25), रेवणनाथ मुरलीधर ढेरे (वय 39), श्रीकांत प्रकाश ढेरे (वय 25 सर्व रा. विटा ता. करमाळा जि. सोलापूर) असे अटक केलेल्यांची नावे आहेत.

करमाळा तालुक्यातील काही इसम हे रेशनिंगचा तांदूळ आणि गहू नागरिकांना न देता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी काळ्या बाजारात विक्री करणार आहेत, अशी माहिती कर्जत पोलिसांना समजली. पोलिसांनी राशीन- कर्जत रोडवर सापळा लावत दोन वाहने अडविली. त्यात धान्य आढळून आले. त्यांना या धान्य बाबत विचारपूस केली असता त्यांनी सदरचा माल हा रेशनिंगचा असून काळ्या बाजारात विक्री करणार होतो असे कबूल केले.

उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, भगवान शिरसाठ, पोलीस कर्मचारी तुळशीदास सातपुते, मारुती काळे, भाऊसाहेब काळे, संभाजी वाबळे, सागर म्हेत्रे, संपत शिंदे, देविदास पळसे, शाहूराज तिकटे यांनी केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com