संगमनेरात भाजपचे रास्तारोको आंदोलन

संगमनेरात भाजपचे रास्तारोको आंदोलन

संगमनेर (प्रतिनिधी) - ओबीसींच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी एक हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आले. संगमनेर येथील बस स्टँड समोर काल सकाळी भारतीय जनता पक्षाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.

तिघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे न्याय आणि हक्काचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. ते पुन:प्रस्थापित होण्यासाठी, आणि झोपलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी संगमनेर बस स्टँड समोर चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते ज्ञानेश्‍वर कर्पे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. श्रीराज डेरे, शिरीष मुळे, दिपक भगत, मेघा भगत, कांचनताई ढोरे, राजेंद्र सांगळे, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस भारत गवळी, जिल्हा उपाध्यक्ष दिपक भगत, भाजपा ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष संपत गलांडे आणि तालुकाध्यक्ष अ‍ॅड. गोरक्ष कापकर, संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार सुभाष कदम यांनी निवेदन स्विकारले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com