दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी भाजपचा मोर्चा
सार्वमत

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी भाजपचा मोर्चा

मागील तीन महिन्यापासून दुधाचा भाव २० रुपयांपर्यंत आला आहे.

Nilesh Jadhav

नेवासा | तालुका वार्ताहर | Newasa

राज्यातील दूध उत्पादक शेतकरी करोनामूळे प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यातच दुधाचे भाव कमी झाल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. पूर्वी दुधाचे ३० ते ३५ रुपये प्रति लिटर होते आता हेच दर मागील तीन महिन्यापासून २० पर्यंत आला आहेत.

त्या अनुषंगाने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आज तहसील कार्यालयावर भाजपच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. सरकारने मागण्या मान्य करण्यासाठी यावेळ तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, सचिन नागपुरे, राजेंद्र मापारी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Deshdoot
www.deshdoot.com