शिर्डीत भाजपचे नवचेतना योग शिबिर

शिर्डीत भाजपचे नवचेतना योग शिबिर

शिर्डी (शहर प्रतिनिधी) - भारतीय जनता पार्टीच्या सेवा ही संघटना या अभियाना अंतर्गत करोनाच्या महामारीमध्ये सेवा उपक्रम म्हणून उत्तर नगर जिल्ह्यातील शिर्डी कोविड सेंटरमध्ये नवचेतना योग शिबीर राबिवण्यात आले. यामध्ये आपल्या फुफ्फुसाची क्षमता व ऑक्सिजन लेव्हल वाढविण्यासाठी कपालभारती, भस्त्रिका, प्राणायाम व योगा बाधित रुग्णांना आनंदी व तणावमुक्तीसाठी लाभदायी ठरणार असल्याचे मत भाजपचे उपजिल्हाध्यक्ष अशोक पवार यांनी व्यक्त केले.

शिर्डी शहरातील कोविड सेंटरमध्ये भारतीय जनता पक्ष व आर्ट ऑफ लिव्हिंग यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड रुग्णांसाठी नवचेतना योग, प्राणायाम, ध्यान शिबिराचा शुभारंभ भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, साईबाबा हॉस्पिटलचे प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रितम वडगावे यांच्या हस्ते पार पडला.

याप्रसंगी अशोक पवार यांनी सांगितले, भारतीय जनता पार्टीच्या सेवा ही संघटना या अभियानांंतर्गत करोनाच्या महामारीमध्ये सेवा उपक्रम म्हणून उत्तर नगर जिल्ह्यातील कोविड सेंटरमध्ये हे नवचेतना योग शिबीर राबिवण्यात येणार आहे. आर्ट ऑफ लिव्हिंगचे डॉ. दिपक जानी यांनी सांगितले, नियमित योगा केल्याने मनावरील ताणतणाव कमी होतो. सध्या करोनाचा वाढता पादुर्भाव पाहता प्रत्येकाने योग करणे गरजेचे आहे. यामुळे आनंदी जीवन जगण्यास मदत होईल.

प्रास्ताविक राजेश टिक्यांनी यांनी केले. याप्रसंगी युवा मोर्चाचे प्रदेश सदस्य किरण बोराडे, संजय जगताप, अमोल बढे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी कोविड सेंटरमधील करोनाबाधीत रुग्णांनी देखील योगासनांची प्रात्यक्षिके करून भविष्यात आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी कटीबद्ध राहणार असल्याचे सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com