श्रीगोंदा l प्रतिनिधी

वाढीव वीज बिलाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने महावितरणच्या मुख्य कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. विज बिल न भरणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन तोडले जाईल. असा इशारा महावितरणने दिला होता.

महावितरणने महाराष्ट्रातील ७५ लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवलेली आहे. यामध्ये श्रीगोंदा तालुक्यातील अनेकांना विजतोडीची नोटीस व तोंडी माहिती देण्यात आलेली असून विजतोडीचे काम महावितरणने चालू केले आहे. दरम्यान, महावितरणकडून अनेकांना वाढीव वीज बिल करोना काळामध्ये आलेली आहेत, अनेकांची बिले तर लाखोंच्या घरात आलेली आहेत. तसेच तालुक्यात घोड विसापूर व कुकडीचे आवर्तन चालू आहे. अशा वेळी शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्याच्या निषेधार्थ श्रीगोंदा येथे भाजपाच्या वतीने महावितरण कार्यालयावर 'हल्लाबोल व ठिय्या' आंदोलन करण्यात आले.

यावेळी बोलतांना आमदार बबनराव पाचपुते यांनी आघाडी सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला. राज्य सरकारने शेतकऱ्याचा गळा घोटण्याच काम केले आहे, असा आरोप त्यांनी केला. तसेच, वीज कनेक्शन तोडण्याऐवजी सरकारने वीज मंडळाला एक हजार कोटीची तरतूद करावी व शेतकरी वाचवावा असे पाचपुते यांनी म्हंटले आहे. यावेळी भाजपा श्रीगोंदा तालुका अध्यक्ष संदीप नागवडे, बाळासाहेब महाडिक, उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे, नगरसेवक संतोष खेतमाळीस, बापूसाहेब गोरे, अशोक खेंडके, संग्राम घोडके, शहाजी खेतमाळीस, नितीन नलगे, माजी सभापती शहाजी हिरवे, पोपट खेतमाळीस, दीपक शिंदे, राजेंद्र उकांडे, जयश्री कोथिंबिरे, दीपक हिरनावळे, महेश क्षीरसागर आदी उपस्थित होते. यावेळी वीजवितरणचे अधिकारी चौगुले यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.