शेवगाव (वार्ताहर/तालुका प्रतिनिधी) -

भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे म्हणाले, महावितरण कंपनी 75 लाख विद्युत ग्राहकांचे कनेक्शन तोडून 6 कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करत असून

शासन मोगलाई असल्यासारखे वागत आहे. इंग्रजांपेक्षाही निष्ठुरतेने शेतकर्यांकडून वसुली करीत आहे, या गोष्टीचा आम्ही निषेध करतो, भारतीय जनता पार्टी शेतकर्याच्यासोबत असून आम्ही कोणाचेही विद्युत कनेक्शन तोडू देणार नाही. प्रसंगी यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे म्हणाले.

राज्यातील शेतकरी सततचा कोरडा दुष्काळ व गेल्या वर्षीचा ओला दुष्काळ अशा कारणामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी आता कुठे उभा राहत असताना महावितरणने शक्तीने वीज बिल वसुली सुरू केली आहे. शेतकर्याचे विद्युत कनेक्शन तोडणे, डीपी बंद करणे असे प्रकार सुरू आहेत. याकामी राज्य शासनाचे महावितरणला पाठबळ आहे. महावितरणने शेतकर्यांप्रती आस्था ठेवून सक्तीची वीज वसुली थांबवावी, 100 युनिटपर्यंतचे वीज बील माफ घोषणेची अंमलबजावणी व्हावी, करोना कालावधीतील वीज बिल माफ करावे, पूर्ण दाबाने विद्युतपुरवठा व्हावा आदी मागण्यांसाठी महावितरणचे शेवगाव कार्यालयासमोर भाजपच्यावतीने हल्लाबोल आंदोलन करण्यात आले.

किसान मोर्चा प्रदेश सदस्य बापूसाहेब पाटेकर, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष कचरू चोथे, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे, सरचिटणीस भीमराज सागडे, नवनाथ कवडे संदीप वाणी, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन वारकड, किसान मोर्चा तालुका अध्यक्ष सरपंच बाबासाहेब गोर्डे, नगरपरिषदेचे उपाध्यक्ष वजीर पठाण, गणेश कोरडे, नगरसेवक कमलेश गांधी, सागर फडके, महेश फलके, विनोद मोहिते, नितीन दहिवळकर, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, गंगाभाऊ खेडकर, राहुल बंब, सुरज लांडे, राजाभाऊ लड्डा, अमोल सागडे, नितीन फुंदे, एकनाथ खोसे, मंगेश पाखरे, किरण काथवटे, बाळासाहेब झिरपे, अशोक झिरपे, अप्पासाहेब झिरपे, अशोक ससाणे, बशीर पठाण, संतोष घुले, मंदार मुळे, शुभम काथवटे आदी उपस्थित होते.