
नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे उपस्थितीत तालुक्यातील देवगाव व नांदूर शिकारीतील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
नांदूर शिकारीचे माजी सरपंच सतीषराव कर्डिले, देवगाव तंटामुक्तीचे अध्यक्ष कचरुदास गुंदेचा, देवगाव सोसायटीचे माजी सचिव भगवान निकम, भाजपा किसान मोर्चा चिटणीस दत्तात्रय निकम, रमेश निकम व दादासाहेब निकम यांच्यासह देवगाव व नांदूर शिकारी येथील अनेक भाजप कार्यकर्त्यांनी सोनई येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी नेवासा बाजार समिती सभापती डॉ.शिवाजीराव शिंदे, पंचायत समिती उपसभापती किशोर जोजार, तुकाराम मिसाळ, पंचायत समिती सदस्य अजित मुरकुटे, मुकिंदपूरचे सरपंच सतीश निपुंगे, माजी सरपंच गोरक्षनाथ निकम, ज्ञानेश्वर कारखाना माजी संचालक रावसाहेब निकम, देवगावचे उपसरपंच महेश निकम, सखाहारी आगळे, भाऊसाहेब मोरे, अशोक गुंदेचा, बाबासाहेब पाडळे, शब्बीर सय्यद, कुंदन भंडारी, उत्तम भावराव आगळे, दिपक निकम, ईश्वर काळे, योगेश निकम, बाळासाहेब लिंगायत, गणेश शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.