
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशभरात भारतीय जनता पक्षाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर व श्रीराज डेरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहरात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने काढण्यात आलेल्या विकास तीर्थयात्रा रथाचे युवा मोर्चाच्यावतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले.
नॉर्दन ब्रँच येथील हनुमान मंदिरापासून विकास तीर्थ यात्रेच्या रथाच्या परिक्रमेस सुरुवात झाली. भारतीय जनता पक्ष व भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते दुचाकीसह या विकासरथ यात्रेत सहभागी झाले होते. मोदी सरकारच्यावतीने गेल्या आठ वर्षांपासून देशभरामध्ये राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. शिवाजी रोड, मेन रोड, संगमनेर रोड, नेवासा रोड मार्गे घोषणा देत तीर्थरथयात्रा नेवाशाकडे रवाना झाली.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सुनील वाणी, शहराध्यक्ष मारुती बिंगले, मिलिंदकुमार साळवे विजय आखाडे, रवी पंडित, भारतीय जनता युवा मोर्चाचे अक्षय वर्पे, अक्षय नागरे, रुपेश हरकल, श्रेयस झिरंगे, संजय गाडेकर, सुजित तनपुरे आदींनी या विकास तीर्थ रथयात्रेचे स्वागत केले. त्यानंतर ही विकास तीर्थ रथ यात्रा श्रीरामपूर शहराकडे मार्गस्थ झाली. पक्षाचे शिर्डी लोकसभा प्रभारी योगराज सिंग परदेशी, सोमनाथ बोरसे, अश्विन बेल्हेकर, अजय हासे आदी या यात्रेत सहभागी झाले होते.
तीर्थयात्रेच्या यशस्वीतेसाठी बंडूकुमार शिंदे, अजित बाबेल, अनिल भनगडे, गणेश कराडे, अमित अग्रवाल, संतोष महाडिक, योगेश ओझा, हंसराज बत्रा, गौतम झावरे, सृजल त्रिवेदी, किरण रोकडे, किरण रक्टे, प्रवीण शिंदे, पार्थ झिरंगे, अनिकेत वाडेकर, अमित अग्रवाल, समर्थ झिरंगे, सौरभ मुखेडकर आदींनी परिश्रम घेतले.