स्ट्रीट लाईटचे कनेक्शन तातडीने जोडावीत अन्यथा व्यापक जनआंदोलन छेडणार

माजी आमदार वैभव पिचड यांचा इशारा
स्ट्रीट लाईटचे कनेक्शन तातडीने जोडावीत अन्यथा व्यापक जनआंदोलन छेडणार

अकोले |प्रतिनिधी| Akole

अकोले (Akole) तालुक्यातील ग्रामपंचायंतीच्या स्ट्रीट लाईटचे (Gram Panchayat Street Light) तोडलेले कनेक्शन तातडीने जोडावीत अन्यथा यापेक्षाही मोठे जनआंदोलन (Movement) करण्यात येईल व त्याच्या दुष्परिणामास राज्य सरकार (State Government) व वीज वितरण विभाग जबाबदार राहील, असा इशारा भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय मंत्री तथा माजी आमदार वैभवराव पिचड (BJP Vaibhav Pichad) यांनी दिला.

ग्रामपंचायतीचे स्ट्रीटलाईट वीजबिल (Gram Panchayat streetlight electricity bill) आज पर्यंत जिल्हा परिषद (Zilla Parishad) भरते. मात्र आता पहिल्यांदा ग्रामपंचायतला बिले आली असून पंधराव्या वित्त निधीतून याची तरतूद करा असे वितरण कंपनी सांगते. मात्र असा कुठलीही आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिलेला नाही व अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी वितरण कंपनीला पत्र दिले असून पंधराव्या वित्त आयोग निधीतून तरतूद करता येणार नाही. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने ग्रामपंचायतीचे वीज कनेक्शन कट केलेले आहे. यावेळी लेखी निवेदन उपअभियंता श्री. मुळे यांनी स्वीकारले.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे, जि. प. अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, आदिवासी सेलचे जिल्हाध्यक्ष विजयराव भांगरे, तालुका सरचटणीस यशवंतराव आभाळे, भाऊसाहेब वाकचौरे, मच्छिंद्र मंडलीक, सुधाकरराव देशमुख, गोरक्ष मालुंजकर, राजेंद्र डावरे, बाळासाहेब वडजे, राहुल देशमुख, सचिन शेटे, परशुराम शेळके, रमेश राक्षे, बाबासाहेब उगले, डॉ. रवींद्र गोर्डे, राजेंद्र गवांदे, प्रकाश पाचपुते, ज्ञानेश्वर वाकचौरे, सुनील देशमुख, राजेंद्र भांगरे, किशोर धुमाळ, नरेंद्र नवले, विजय पवार, निलेश वाकचौरे, राज गवांदे, विनेश देशमुख, कविराज भांगरे, नामदेव निसाळ, सचिन उगले, शैलेश फटांगरे, वाल्मिक नवले, गोकुळ वाघ, सागर बाळसराफ, सौरभ देशमुख, बाबाजी गोंदके, संतोष फापाळे, राजेंद्र देशमुख आदींसह अनेक कार्यकर्ते, सरपंच ग्रा.प.सदस्य उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com