भाजपचा मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद आंदोलनाला पाठिंबा - गोंदकर

भाजपचा मंदिरे उघडण्यासाठी शंखनाद आंदोलनाला पाठिंबा - गोंदकर

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

राज्यातील ठाकरे सरकारने (Thackeray Government) पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद (Religious places closed) करून ठेवली आहेत. आता सर्वत्र व्यवहार सुरळीत असतांंना सुद्धा अद्यापही मंदिरे बंदच आहे. मंदिरांवर अवलंबून असणार्‍या लाखो लोकांच्या उपजीवीकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होत असून त्यांना राज्य सरकार (State Government) कोणतीही आर्थिक मदत देत नाही व मंदिरेही उघडत नाही. ठाकरे सरकारला (Thackeray Government) मंदिरे खुले करण्याचा इशारा (Hint) देण्यासाठी श्रीकृष्ण जयंती व चौथा श्रावण सोमवारच्या मुहूर्तावर 31 ऑगस्ट रोजी भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीतर्फे जिल्हाभर शंखनाद आंदोलन होणार असल्याने या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा (BJP) पूर्णपणे पाठिंबा असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर (BJP district president Rajendra Gondkar) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, सध्या राज्यात सत्तेत असलेल्या पक्षांना त्यांचे मोठ्या संख्येने घेत असलेले कार्यक्रम,आंदोलने, मोर्चे, वसुली गुंडगिरी करताना त्यांना करोनाचा प्रादूर्भाव दिसत नाही का? फक्त मंदिरे उघडण्याच्या बाबतीतच दिसतो असा प्रश्न उपस्थित केला आहे. राज्यातील सरकार फक्त वसुली व भ्रष्टाचार करून त्यांच्या पोटाची खळगी कशी भरता येईल यातच गुंग असल्याचे त्यांनी म्हटले आहे. देशातल्या अन्य राज्यांत मात्र मंदिरे (Temple) सुरू आहेत. आपल्या राज्यातच जाणीपूर्वक ठाकरे सरकार (Thackeray Government) मंदिर उघडण्यास परवानगी देत नाही. देव धर्मावर सातत्याने अन्याय करणार्‍या, देवी-देवतांना कडी कुलुपात बंदिस्त करून व लाखो गरिबांना उपासमार करणार्‍या ठाकरे सरकारला मंदिरे खुले करण्याचा इशारा (Hint) देण्यासाठी आमचा पाठिंबा असून या आंदोलनात सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती श्री. गोंदकर (Rajendra Gondkar) यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com