ठाकरे सरकारचा शेतकरीद्रोही चेहरा उघड !

भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांची टीका
ठाकरे सरकारचा शेतकरीद्रोही चेहरा उघड !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दोन वर्षांपासून केवळ खोटी आश्वासने देत जनतेस झुलवत ठेवणार्‍या ठाकरे सरकारने (Thackeray Government) राज्यातील शेतकर्‍यांना प्रत्येक संकटात वार्‍यावर सोडले आहे. अतिवृष्टीसारख्या भीषण संकटात भरडलेल्या शेतकर्‍यास कवडीचीही मदत न देता पाठ फिरविणारे ठाकरे सरकार (Thackeray Government) शेतकरी विरोधी नव्हे, तर शेतकरीद्रोही (Anti-farmer) आहे, असा घणाघाती आरोप करीत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे (BJP state vice president Ram Shinde) यांनी सोमवारी ठाकरे सरकारच्या शेतकरीद्रोही कारवायांचा पाढाच माध्यमांसमोर उघड केला.

गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रावर असंख्य नैसर्गिक आपत्ती कोसळल्या. करोनासारख्या महामारीत (Covid 19 Pandemic) बेपर्वाईमुळे अनेक निष्पाप जिवांचे बळी गेले. टाळेबंदी जाहीर केल्यानंतर हातावर पोट असणार्‍यांना मदतीची घोषणा करून त्यांच्या तोंडाला सरकारने (Government) पाने पुसली. निसर्ग चक्रीवादळात पुरता उद्ध्वस्त झालेल्या कोकणातील शेतकर्‍यास मदत देण्याचे आश्वासन देणार्‍या मुख्यमंत्र्यांनी नंतर त्याकडे ढुंकूनही पाहिले नाही, उलट मदत मिळाली किंवा नाही याचाही थांगपत्ता नसल्याची कबुली देऊन संकटग्रस्त शेतकर्‍यांची थट्टा केली.

दुसर्‍या टाळेबंदीत रोजगार बुडालेल्या हजारो कुटुंबांच्या मदतीसाठी केंद्राकडे बोटे दाखवत ठाकरे सरकारने (Thackeray Government) ती जबाबदारीदेखी टाळली. नंतरच्या तौक्ते चक्रीवादळात केवळ धावता दौरा करून मदतीचे गाजर दाखवत परतलेल्या मुख्यमंत्र्यांनी या वादळग्रस्तांनाही वार्‍यावर सोडले आणि आता अतिवृष्टीच्या भीषण संकटात सापडून, उस (Sugar Cane), सोयाबीन (Soybeans), कापूस (Cotton) आदी पिकांच्या हानीमुळे सर्वस्व गमावलेल्या शेतकर्‍याविषयी साधी सहानुभूतीदेखील न दाखविता नियमांच्या कागदावर बोटे नाचवत दाखवत शेतकर्‍यांची क्रूर थट्टा सुरू आहे, असा आरोप भाजप प्रदेश उपाध्यक्ष शिंदे (BJP state vice president Ram Shinde) यांनी केला.

शाब्दिक फुंकर मारून संकटग्रस्तांचे आश्रू पुसण्याचा कांगावा करताना आपली कातडी बचावण्यासाठी केंद्र सरकारकडे (Central Government) बोटे दाखविणार्‍या ठाकरे सरकारचा (Thackeray Government) मुखवटा उघडा पडला असून सरकारचा खरा चेहरा शेतकरीद्रोहीच आहे, असे ते म्हणाले. कोणालाही वार्‍यावर सोडणार नाही अशी खोटी आश्वासने देऊनही आता पाच महिने उलटून गेले. वादळग्रस्त आणि पूरग्रस्त शेतकरी अजूनही वार्‍यावरच आहेत आणि आता अतिवृष्टीग्रस्तांची भर पडली असल्याचे शिंदे (BJP state vice president Ram Shinde) म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com