महाविकास आघाडीमुळे ओबीसीचे नुकसान : राम शिंदे

महाविकास आघाडीमुळे ओबीसीचे नुकसान : राम शिंदे

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

ओबीसींचे (OBC) राजकीय आरक्षण (Political Reservation) पुन्हा लागू होण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) नगरपालिकांच्या वॉर्ड रचनेचा आदेश (Order of formation of municipal wards) दिल्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत (municipal elections) ओबीसींना आरक्षण (OBC Reservation) मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi Government) बेफिकीरमुळेच ओबीसी समाजाचे (OBC Community) जबरदस्त नुकसान झाले आहे, अशी टीका (criticism) भाजप प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे (BJP state vice president Ram Shinde) यांनी गुरुवारी केली.

नगरपालिका (Municipality), जिल्हा परिषद (Zilla Parishad) आणि नगरपालिकांच्या (Municipality) आगामी काही महिन्यांत होणार्‍या निवडणुकात (Eelection) ओबीसींना राजकीय आरक्षण (Political reservation to OBC) मिळूच नये, असा महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi government) प्रयत्न असल्याचा संशय या सरकारच्या ढिलाईवरून येतो, असेही त्यांनी सांगितले. शिंदे (BJP state vice president Ram Shinde) म्हणाले, राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील अठरा महानगरपालिकांच्या प्रशासनाला निवडणुकीसाठी (Election to the administration of the corporation) वॉर्ड रचनेचा मसुदा तयार करण्यास सांगितले आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द (OBC Political reservation canceled) केल्यानंतर न्यायालयाच्या सूचनेनुसार महाविकास आघाडी सरकारने तातडीने एंपिरिकल डेटा गोळा करून ओबीसींचे (OBC) हे आरक्षण पुन्हा अंमलात आणणे आवश्यक आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com