रांजणगाव देशमुख तालुका हद्द ते झगडेफाटा रस्त्यावरील खड्डे बुजवावे - स्नेहलता कोल्हे

रांजणगाव देशमुख तालुका हद्द ते झगडेफाटा रस्त्यावरील खड्डे बुजवावे - स्नेहलता कोल्हे
स्नेहलता कोल्हे

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

राज्य मार्ग 65 रांजणगांव देशमुख (Rajangav Deshmukh) तालुका हद्द ते झगडेफाटा (Zagadephata) या रस्त्याची (Road) अवस्था अत्यंत बिकट झाली असून त्यावर मोठ्या प्रमाणांत खड्डे (Pits) पडल्याने अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनाचे अतोनात नुकसान होत आहे, प्रवाशी व पादचारी नागरिकांना त्याचा त्रास होत आहे तेव्हा हे खड्डे (Pits) तातडीने बुजवावेत अशी मागणी (Demand) भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे (BJP state secretary Snehlata Kolhe) यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पी.बी.भोसले (PB Bhosle, Chief Engineer, Construction Department) यांच्याकडे केली आहे.

स्नेहलता कोल्हे (BJP state secretary Snehlata Kolhe) यांनी पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्यमार्ग 65 रांजणगांव देशमुख (Rajangav Deshmukh) तालुका हदद ते झगडेफाटा (Zagadephata) हा रस्ता वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र त्यास मोठ्या प्रमाणात खड्डे (Pits) पडल्याने वाहनधारकांचे हात, पाय, कंबरडे मोडले आहे. अन्य शारीरीक अवयवांना देखील मोठ्या प्रमाणांत इजा झाली आहे. तर काही निरपराध नागरिकांना प्राणही गमवावे लागले आहेत.

वाहन धारकांनी याबाबत आंदोलनाचा इशारा (Hint Movement) दिला आहे. रस्ते वाहतुकीदरम्यान अपघाताचे प्रमाण वाढल्याने रात्री अपरात्री यावरून वाहतूक करणे जिकरीचे झाले आहे. वाहने नादुरुस्त होऊन वाहनधारकांना आर्थीक झळ मोठ्या प्रमाणात सोसावी लागत आहे. हे खड्डे बुजविले नाही तर या महामार्गाची आणखी दुरवस्था होईल तेव्हा हे खड्डे तातडीने बुजवावेत अन्यथा आपल्याला देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असेही त्या म्हणाल्या.

Related Stories

No stories found.