गोदावरी नदी काठोकाठ कालवे मात्र कोरडेठाक

गोदावरी कालव्यांना तातडीने खरिपाचे आवर्तन सोडा- स्नेहलता कोल्हे
गोदावरी नदी काठोकाठ कालवे मात्र कोरडेठाक

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

गेल्या 70 दिवसांपासून कोपरगाव तालुक्यात (Kopargav Taluka) पावसाने (Rain) ओढ दिल्याने खरीप पिकांची (Kharif Crops) धूळधाण झाली आहे. शेतकरी राजा आशाळभूत नजरेने आकाशाकडे पाहतो आहे. गोदावरी नदी (Godavari River) काठोकाठ भरून वाहते आहे, पण गोदावरी कालवे (Godavari Canal) मात्र कोरडेठाक पडले असून पाटपाणी आवर्तनाचा खेळखंडोबा झाला आहे. तेव्हा पाटबंधारे खात्याने तातडीने गोदावरी कालव्यांना खरिपाचे आवर्तन (Godavari Canal Kharif Avartan) सोडून शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भाजपाचे प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे (BJP Snehlata Kolhe) यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) व नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली आहे.

त्या म्हणाल्या की, 25 हजार एकर शेत शिवार गोदावरी कालव्याच्या (Godavari Canal) माध्यमातून फुलत असतो. उर्ध्व गोदावरी खोर्‍यात घोटी (Ghoti), इगतपुरी (Igatpuri), त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) भागात पर्जन्यमान चांगले झाल्याने गोदावरी नदी (Godavari River) दुथडी भरून वाहत आहे. दारणा (Darana), गंगापूर धरणे (Gangapur Dam) 75 टक्के च्या पुढे भरली आहेत. कोपरगाव (Kopargav) व गोदावरी कालवे (Godavari Canal) लाभक्षेत्रात पावसाने ओढ दिली आहे. शेतकर्‍यावर सुरुवातीलाच दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. त्याने पदरमोड करत पत्नीचे दागिने गहाण ठेवत कर्ज काढून खरिपाची पिके (Kharif Crops) पुन्हा कशीबशी घेतली पण पाऊस नसल्याने ती पाण्याअभावी जळून चालली आहेत.

पिकांना पाणी मिळाले नाही तर शेतकर्‍यांपुढे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नाही. गोदावरी कालव्यांना खरिपाचे आवर्तन सोडावे म्हणून आम्ही सातत्याने मागणी करत आहोत. शेतकर्‍यांचा दबावही दिवसेंदिवस वाढत आहे. समन्यायी पाणीवाटपाची भीती दाखवून जायकवाडीच्या पाण्याची काळजी घेत, गोदावरी कालवे लाभधारक शेतकर्‍यांच्या बोकांडी प्रत्येक वेळी ही भीती दाखवली जाते. त्या नावाखाली आतापर्यंत पाच टीएमसी पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आलेले आहे. गोदावरी कालव्यांना अवघ्या दीड टीएमसी पाण्याची गरज असताना पाटबंधारे खात्याने व संबंधित यंत्रणेने त्याचा खेळखंडोबा केला आहे.

कडेवरचे सांभाळण्याच्या नादात गोदावरी कालवे लाभधारक शेतकर्‍यांचा बळी दिला जात आहे. तेव्हा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil), नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी आता शेतकर्‍यांचा अंत न पाहता तातडीने गोदावरी कालव्यांना खरीप पिकाचे पाण्याचे आवर्तन सोडून दिलासा द्यावा अन्यथा हा शेतकरी वर्ग रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशारा सौ. स्नेहलता कोल्हे (HInt BJP Snehlata Kolhe) यांनी दिला आहे.

ज्यांच्याकडे गोदावरी कालवे पाटपाण्याची जबाबदारी आहे ते मात्र नगरपालिकेच्या आरोप-प्रत्यारोपात गर्क आहेत, शेतकर्‍यांच्या खरीप पिकांची वाताहात झाली, तरी त्यांना त्याचे सोयरसूतक नाही.

- स्नेहलता कोल्हे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com