भाजप, शिवसेना, रिपाइंचे साखळी उपोषण तिसर्‍या दिवशीही सुरूच

विविध संस्था, संघटना व नागरिकांकडून उत्स्फूर्त पाठिंबा
भाजप, शिवसेना, रिपाइंचे साखळी उपोषण तिसर्‍या दिवशीही सुरूच

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाने अवास्तव वाढीव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणी करावी यासह इतर मागण्यांसाठी भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि रिपाइं (आठवले गट) ने 27 सप्टेंबरपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे. या साखळी उपोषणाला विविध संस्था आणि संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला. काल तिसर्‍या दिवशी गुरुवारीही हे उपोषण सुरूच होते.

वाढीव घरपट्टी रद्द करून पूर्वीप्रमाणेच घरपट्टी आकारणीचा निर्णय होईपर्यंत हे उपोषण चालूच ठेवण्याचा ठाम निर्धार उपोषणकर्त्यांनी व्यक्त केला आहे. कोपरगाव शहरातील 25 हजार मालमत्ताधारकांच्या जिव्हाळ्याच्या घरपट्टीवाढीच्या प्रश्नावर सुरू असलेल्या या उपोषणाला विविध संस्था, संघटनांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.

या उपोषणास कोपरगाव वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी खामकर, अ‍ॅड. अशोक टुपके, अ‍ॅड. योगेश खालकर, अ‍ॅड. मनोहर येवले, अ‍ॅड. महेश भिडे, अ‍ॅड. दीपक पवार, अ‍ॅड. ए. एस. आगवण, अ‍ॅड. मोकळ, अ‍ॅड. विलास गिरे आणि इतर वकील मंडळींनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.

अ‍ॅड. मनोहर येवले यांनी नगरपालिकेने वाढीव घरपट्टीच्या नोटिसा पाठविल्यामुळे सर्वसामान्य नागरिक अत्यंत हवालदिल झाले आहेत. आपण एकटे काही करू शकत नाही, असे त्यांना वाटत होते. परंतु आपण त्यांना लढण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिले. त्यामुळे त्यांना खूप मोठा आधार मिळाला आहे. या प्रश्नात कायदेशीर लढाई करण्याची वेळ आल्यास आम्ही सर्व वकील मंडळी नागरिकांना विनामूल्य कायदेशीर मदत करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कोपरगाव शहर डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ. विजय क्षीरसागर, डॉ. अभय दगडे, डॉ. नरेंद्र भट्टड, डॉ. रामदास आव्हाड, डॉ. बंब आदींनी या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दिला. ज्येष्ठ नागरिक संघाचे विजय बंब, विभूते नाना यांच्यासह अनेक ज्येष्ठ नागरिकांनीही भेट देऊन उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला.

ब्राह्मण सभेचे पदाधिकारी संजय सातभाई, अध्यक्ष मकरंद कोर्‍हाळकर, उपाध्यक्ष गोविंद जवाद, बाळकृष्ण कुलकर्णी, सचिव सचिन महाजन, सहसचिव संदीप देशपांडे, खजिनदार जयेश बडवे, सहखजिनदार योगेश कुलकर्णी, संघटक महेंद्र कुलकर्णी, गौरीश लहुरीकर, डॉ. मिलिंद धारणगावकर, श्री. जोशी, मिलिंद जोशी आदींनी या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दिला.

कहार समाज व भाजी विक्रेता संघाचे अध्यक्ष अर्जुन पंडोरे, राहुल गंगुले, सचिन लचुरे, संदीप पंडोरे, सुरज लोखंडे, सुरज मेहेर, हिरालाल लकारे, राजेंद्र गंगुले, जनाबाई पंडोरे, मुकेश डिंबर, सचिन गंगुले, अमरचंद कुंढारे, सागर गंगुले, विशाल लकारे, पंडित पंडोरे, विठ्ठल पंडोरे, राजेंद्र मेहेरे, अशोक कंदे, विनोद जिरे, ईश्वर पंडोरे, प्रसाद पर्‍हे व इतर अनेक भाजी विक्रेत्यांनी या उपोषणाला भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला. तसेच कहार समाज युवा परिवार ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ गंगुले, उपाध्यक्ष गणेश गंगुले, खजिनदार ईश्वर लकारे, पदाधिकारी तुकाराम गहिरे, ईश्वर पंडोरे आदींनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दशविला.

कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या गोकुलचंद विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोर्‍हाळकर, उपमुख्याध्यापक गायकवाड व शिक्षक वर्ग, अहिर सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष पंडित यादव, अनिल जाधव, योगेश बागुल, अरुण बागुल, भाऊसाहेब बागुल, अशोक दुसाने आणि इतर अनेक समाजबांधवांनी पाठिंबा दिला. कोपरगाव सिव्हील इंजिनिअर्स अ‍ॅण्ड आर्किटेक्ट असोसिएशनचे पदाधिकारी रोहित वाघ, सोमेश कायस्थ, संदीप राहतेकर, प्रदीप मुंदडा, शिरीष दुबे व इतर सदस्य, लक्ष्मीनगर येथील संघर्ष तरुण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र लोखंडे आणि इतर पदाधिकारी, जिल्हा बँक एम्प्लॉईज युनियन व पिपल्स बँक कर्मचारी युनियनचे पदाधिकारी प्रदीप नवले, आशीष रोहमारे, निखिल निकम, बबन ससाणे, प्रवीण भुजाडे, के. एस. लांडे व इतर सदस्य, गॅरेज असोसिएशन. खंदक नाला, कोपरगावचे पदाधिकारी अशोक भांगरे, माधव धुमाळ, प्रकाश शेळके, रवींद्र कदम, वामन कदम, रुपेश पहिलवान, संतोष चौधरी, संजय बोरसे, शैलेश रावळ, रावसाहेब साठे, हुराभाई पठाण, कोपरगाव तालुका नागरी पतसंस्था फेडरेशनचे चेअरमन हाशम चाँद पटेल व सदस्य, हमाल पंचायतचे कार्याध्यक्ष वाल्मिक कदम व पदाधिकारी, कहार भोई समाज सेवाभावी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अशोक लकारे, अर्जुन मोरे, विजय बुधा मोरे व सदस्य, अन्याय अत्याचार निर्मूलन समितीच्या महिला आघाडी तालुकाध्यक्षा शकीला पठाण व महिला सदस्य, कुरेशी ग्रुप, संजयनगरचे पदाधिकारी मोबीन कुरेशी, इरफान कुरेशी, इम्रान कुरेशी, अयान कुरेशी, रईस खाटिक, तौफिक अत्तार, रहेमान अत्तार, इरफान कुरेशी, जमीर कुरेशी, वाजीद कुरेशी, मुन्तजीर कुरेशी, सलीम कुरेशी, लंबू कुरेशी, नदीम कुरेशी, इलियास खाटिक, सलीम इंदुरी व इतर सदस्य, अंबिका तरुण मंडळ, शनिमंदिर परिसराचे अध्यक्ष विनायक गायकवाड आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com